नेवासा येथे अनिलभैय्या राठोड यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली


नेवासा(प्रतिनिधी) :- नेवासा येथे शिवसेना नेते अनिल भैय्या राठोड यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांच्या निधनाने नगर जिल्हयातील शिवसैनिक पोरका झाला असून त्यांच्या अचानक निधनाने मन सुन्न झालं असून जिल्हयात शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला असल्याची श्रद्धांजली शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी वाहिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गफूरभाई बागवान, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने जाकीरभाई शेख,काँगेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव,अरुण जाधव,जावेद शेख,क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने हारूणभाई जहागिरदार,प्रेस क्लबचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण,होमगार्ड दलाच्या वतीने शकीलभाई शेख यांनी सामाजिक अंतराचे पालन करत पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी बोलताना बालेंद्र पोतदार म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि प्रखर विचारांनी प्रेरीत होऊन अहमदनगर शहर व जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत शिव सेनेची पाळमुळ त्यांनी रोवली होती.तसेच सामान्य शिवसैनिकाला त्यांनी पाठबळ दिले होते प्रत्येक घरात सपर्क ठेवला होता सर्व छोट्या मोठ्या समारंभाला उपस्थित राहीले,प्रत्येकाच्या सुख दखाःत सहभागी झाले , नगरकरांनीही या प्रामाणीक कार्यकर्त्यांच्या सचोटीची दाद देत त्यांना पंचवीस वर्षे आमदार म्हणून निवडून दिले ! कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारे सर्वांच लाडक व हक्काचा लढवय्या नेतृत्व आज आंम्हा सर्वांना पोरक करून निघून गेले असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here