श्रीरामपूर :- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीवर राहणार्‍या करोना बाधित असलेल्या एकाचा उपचार सुरू असताना नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे
काल करण्यात आलेल्या ६८ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात २४ जणांचे सरकारी अहवाल पॉझिटीव्ह तर ४४ जण निगेटीव्ह आले यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३८४ वर जावून पोहोचली आहे.

संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ११ जणांंनी करोनावर मात केल्यामुळे काल त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंतच्या २३३ जणांनी करोनावर मात केली आहे. ४९ जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ४० जण क्कारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गोंधवणी (३), पढेगाव (४), वॉर्ड नं.७ (७), वढणे वस्ती (१), खंडाळा (१), आशिर्वाद नगर (१), संगमनेर रोड (१), इंदिरानगर (२), नेवासा रोड (२), वॉर्ड नं.३(१), वॉर्ड नं. ६ (१), असे रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत २०६७ जणांचे स्त्राव घेण्यात आले असून ३८३ रुग्ण करोनाबाधित आढळले असून ९२६ रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० वर जावून पोहोचली आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here