अहमदनगर/प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना सारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नगर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना व छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतु ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्याची संभावना आहे असे रसवंती गृह ज्युस सेंटर , चहावाले यांना व्यवसाय करण्याची परवानगी अजून प्रशासनाने दिलेली नाही असे का? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी विचारला आहे

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जूस बार विक्रेते चहा विक्रेते व रस विक्रेत्यांना लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी असे यावेळी बोलताना सांगितले या साथीच्या रोगावर एकच पर्याय असून ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती ही चांगले असेल असेच लोक लवकरात लवकर बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाण वाढणार असून लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहे अशा सर्व गोष्टी प्रशासनाने लवकरात लवकर चालू करावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दििदिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here