श्रीरामपूर :- आज आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ७० रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात ११ जणांचे कोरोना सरकारी अहवाल पॉझिटीव्ह तर ५९ जण निगेटीव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३९५ वर जावून पोहोचली आहे.
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात सबजेल (५), मोरगे वस्ती (२), शेवगाव (१), पढेगाव (१), दत्तनगर(१), बेलापूर (१) रुग्णांचा समावेश आहे.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत २१३७ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३९५ वर जावून पोहोचली आहे. तर ९८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली