श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथील दोघा जणाचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झाला आहे. करोना प्रादुर्भावामुळे गावातील मोठ्या महादेवासह इतर देवस्थाने दर्शनासाठी बंद असल्याने पहाटे सुर्योदयाबरोबर गावांतील गोदाकाठावर स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊ असा विचार करून सकाळी सहा वाजता घरातून निघालेल्या महांकाळ वाडगांव येथील सचिन बाजीराव वानखेडे (२८) व भाऊराव पांडूरंग वानखेडे (३५) या तरूणांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली आहे.

दोघेही तरुण विवाहित असून सचिन यांस पत्नी एक मुलगा एक मुलगी आई, वडील तर भाऊराव यांस पत्नी, ३ मुली, एक मुलगा, आई व वडील आहे. या घटनेमुळे महांकाळ वाडगांवावर शोककळा पसरली आहे. सराला गोवर्धन, नाऊर येथील तरुणांकडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असून भाऊराव यांचा मृतदेह सापडला असून सचिनचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here