कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात कोरोना संसर्गाच्या वाढता प्रार्दुभाव रोखण्या हेतुने एक हजार मास्कचे वाटप माजी सरपंच केशवराव होन यांच्या हस्ते करण्यात आले
आजमितीला कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत असुन चांदेकसारेगावात हि कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे या भितीच्या वातावरणात कोरोना संसर्गापासुन नागरीकांचा बचाव करण्या उद्देशाने शिर्डी -नाशिक मार्गावरील फ्रेंड रिसॉर्ट,जे. के.डी हॉटेलचे अमर बरागडे,अमित ठक्कर,व पवन दुबे यांनी चांदेकसारे गावासाठी मोफत एक हजार मास्कचे वाटप केले आहे.
तालुक्यात सगळीकडेच कोरोनाचा फैलाव होत असुन
चांदेकसारे गावही त्यास अपवाद नाही गावात ही कोरोना बाधीत रुग्ण आढळले असुन त्यात एकाचा मृत्यू झाला.असल्याने वाढलेले कोरोना बाधीतांचे प्रमाणा पाहुन ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नसून योग्य ती खबदार दारी घेतल्यास आपण कोरोनाला आपाल्या पासुन दुर ठेवु शकतो असे माजी सरपंच केशवराव होन यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने अमर बरागडे,अमित ठक्कर पवन दुबे यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here