श्रीरामपूर :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील करोनाबाधित असलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा नगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर तालुक्यात आज नव्याने २० रुग्णांची भर पडली आहे

आज आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ७४ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात २० जणांचे कोरोना सरकारी अहवाल पॉझिटीव्ह आले आहे तर ५४ जण निगेटीव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ४२९ वर जावून पोहोचली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात वार्ड नं २ (२), वार्ड नं ३ (१), वार्ड नं ४ (२), डावखर मळा (२), गोंधवणी (१), वार्ड नं ७ (४), उंबरगाव (१), मातापुर (१), खंडाळा (१), बेलापुर (४), दत्तनगर (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.

संत लूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कालपर्यंत २५८ जण बरे झाले आहेत. काल १८ जणांंनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर ५१ जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये ४४ जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत २२२४ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२९ वर जावून पोहोचली आहे. तर १०४७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here