रांजणखोल/प्रतिनिधी(भाऊसाहेब जाधव) :- राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे आज सोमवारी संध्याकाळी एक कोरोना पाॅझीटिव रुग्ण आढळुन आला असल्याची माहिती राहाता तालुका येथील ग्रामीण रुग्णालयाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी  ङाॅ. प्रकाश म्हस्के यांनी दिली कोरोना पाॅझीटिव रुग्णांच्या  घरातील सर्व जणांची  रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे
नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे, असे आवाहन सरपंच चांगदेव अण्णा ढोकचौळे  यांनी केले आहे. आत्तापर्यंत रांजणखोल परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी रांजणखोल परिसरात विशेष लक्ष दिले आहे कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजना म्हणुन रांजणखोल परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येत आहे रांजणखोल परिसर तीन दिवस बंद पाळण्यात येणार आहे त्यामुळे बाहेरील नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here