श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरात एका नामांकित दुकानात कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी यांनी लागु केलेले कलम १८८ ,२६९ चा भंग केल्या प्रकरणी सदर दुकानदावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर वृत्त माहिती असे कि श्रीरामपुर शहरात राममंदीर चौक मेनरोड येथे त्या व्यापाऱ्याच्या दुकान असुन दि. १० / ०८ / २०२० रोजी सकाळी ११ .३० सुमारास श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांना सदर दुकानात प्रवेश केला असता तेथील कर्मचारी व गिराईक यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे तसेच सोशल डिस्टिगशनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आले.असता त्यांनी सदर दुकानदार यांच्यावर दुकानात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असताना तोंडाला मास्क न लावल्याने, इतरांना कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव होईल असे बेकायदेशीर व हलगर्जी पणाचे कृत्य केले व मा. जिल्हाधिकारी सो. अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पो.कॉ.अर्जुन दत्तात्रय पोकळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कलम १८८ २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन.
पुढील तपास श्रीरामपुर पोलीस ठाण्याचे मा.निरीक्षक श्रीहरी बहीरट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो . हे .कॉ. जे.एस. साळवी.आर.डी कोरडे. हे करीत आहेत .

1 COMMENT

  1. अरे जर दुकानदार नाव लिहिण्याची हिम्मत नसेल तर बातमी कशाला देता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here