श्रीरामपूर :- श्रीरामपूर तालुक्यातील आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ४९ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १० जणांचे कोरोना सरकारी अहवाल पॉझिटीव्ह आले आहे तर ३९ जण निगेटीव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ४३९ वर जावून पोहोचली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात वार्ड नं २ (१), बेलापुर (१), महाडा कॉलनी (२), निपाणी वडगाव (२), संगमनेर रोड (२), गोंधवणी रोड (१), बोरावके नगर (१), अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.३५% टक्के इतकी आहे. 

संत लूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आजपर्यंत २७९ जण बरे झाले आहेत. आज २१ जणांंनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये ३५ जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत २२७३ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४३९ वर जावून पोहोचली आहे. तर १०८६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here