कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- प्रशासनाने टाळेबंदीचा चौथ्या टप्प्यात टाळेबंदी शिथिल करून काही शर्थी,अटीवर तसेच ठराविक वेळेत कोपरगाव शहरात व्यवसायिकांना आपली दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.परंतु शहरातील सरकारी नोकरदार वर्ग,हातमजूर व कर्मचारी यांची सुट्टी सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत होतेआणि कोपरगावची बाजारपेठ आपण ठरवून दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी 5 वा बंद होते.या कारणाने उपजिवीकेस आवश्यक असलेले साधन अथवा वस्तू ते खरेदी करू शकत नाही.तसेच दुसरा विषय असा की सायंकाळी 5 वा दुकाने पुर्णपणे बंद करण्यासाठी व्यवसायिकांना एक तास आधी आवरा सावर करावी लागते.यामुळे व्यापार व व्यवसाय करण्यासाठी वेळ कमी पडतो . या कारणाने बाजारपेठ चालू ठेवण्यासाठी ठराविक वेळेत बदल करून तो सकाळ 9 ते 8 पर्यंत करण्यात यावा तसेच शहरातील चहा नाश्ताची दुकाने, हाॅटेल,परमिट रूम,आदी सेवा सोशल डिस्टिंगशन नियम पाळुन शिथलता पुर्वत चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी तसेच शहरातील सुवर्णकरांना दागिणेस दाग देण्यासाठी चिमणी आणि तोंडाने फुकण्याची नळीचा वापर करावा लागतो ही नळकांडी तोंडाला मास्क लावल्यास फुकंता येणार नसल्याने या कारणासाठी त्यांना नियमात शिथिलता द्यावी. या मागण्यांचे निवेदन क्रांतीवीर लहुजी टायगर सेनेचा वतीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.

यावेळी शरद त्रिभुवन संस्थापक अध्यक्ष क्रांतीवीर लहुजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य,अंकुश वाघ, अकबर शेख,शरद खरात आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here