कोपरगाव प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- भोजडे-नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भोजडे चौकी शिवारातील रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने येथील शेतक-यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या बिकट प्रश्न निर्माण झाला होता.माजी आमदार सौ स्नेहलता बिपीनदादा कोल्हे या तालुक्यातील पुर्व भागातील दौ-यावर असतांना येथील शेतक-यांनी सौ कोल्हे यांना भोजडे चौकी येथे थांबवून आपली कैफियत मांडली.यावेळी क्षणाचाही विलंब न करता सौ कोल्हे यांनी भ्रमणध्वनीद्वारे वीज मंडळाच्या वरीष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला.व उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देत तातडीने रोहित्र दुरूस्त करून देण्याची मागणी केली. वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष घालुन सदरचे रोहित्र बसवुन दिल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असून या शेतक-यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव ,माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांचे आभार मानले.

जगभरासह देशात कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव सुरू आहे, महाराष्ट्रातही याचा संसर्ग मोठया प्रमाणात आहे.त्यामुळे सध्याच्या परिस्थीतीत शेतक-यांनाही आर्थीक फटका बसला आहे. दळणवळण बंद असल्याने हाती आलेल्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही,आर्थीक विवंचनेचा सामना करत असतांना वेळीअवेळी येणा-या वीजेमुळे त्रासात भरच पडत आहे. सातत्याने जळणा-या वीजेच्या रोहित्रामुळे रात्रभर अंधारात राहण्याची वेळ येथील नागरीकांवर येते.परंतु माजी आमदार सौ कोल्हे यांनी आमच्या समस्येची दखल घेउन तातडीने रोहित्र उपलब्ध करून दिल्याने गेल्या अनेक दिवसापासूनचा आमचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे यावेळी शेतक-यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here