कोपरगाव प्रतिनिधी(मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोपरगांव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कोपरगाव शहरातील शासकीय कार्यालयांना सॅनीटायझर मशीन भेट देण्यात आले आहे. सध्या कोरोना विषाणू व्हायरसच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासकीय अधिकारी कोरोना विषाणूने बाधित होत आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी आदी विविध विभागांचे कर्मचारी कोरोना बाधित झाले असून अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव देखील गमवला आहे. कोरोनाचे संकट सुरु असतांना सर्वसामान्य नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी सर्व शासकीय कार्यालये नियमितपणे सुरु आहेत. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयात काम करीत असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून बचाव व्हावा.या उद्देशातून आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोपरगांव तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने विविध प्रशासकीय कार्यालयांना ३६ सॅनीटायझर मशीन भेट देण्यात आले. यावेळी शिक्षक बँकेच्या संचालिका विद्युलता आढाव, शिक्षक समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे,विकास मंडळाचे विश्वस्त रमेश दरेकर,गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते,शशिकांत जेजुरकर, कोषाध्यक्ष श्रीराम तांबे,प्रमोद जगताप,सिताराम गव्हाणे,प्रदिप भाकरे,आप्पासाहेब चौधरी, संजय खरात,महेंद्र निकम,दत्ता गरुड,लक्ष्मिकांत वाडिले,अनिल झाल्टे,सिध्दांत भागवत,कैलास वाघ,वसंत भातकुडव,राहुल भागवत आदींसह शिक्षक बांधव उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनीटायझर मशीन भेट देतांना कोपरगांव तालुका शिक्षक समन्वय समिती पदाधिकारी व शिक्षक बंधुभगिनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here