श्रीरामपूर :- श्रीरामपुरात काल ४४ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यात शहरातील १४ जण करोना बाधित आढळून आले आहेत. यात पालिकेचा एक अभियंता करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ४५३ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल केवळ ४ जण बरे होऊन घरी परतले आहेत.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये ४४ जणांची तपासणी करण्यात आली. यात १४ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह तर ३० जण निगेटिव्ह आले आहेत.

ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंतराव जमधाडे प्रमुख असलेल्या संतलुक हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ४३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ३२ जण उपचार घेत आहेत.

काल पॉझिटीव्ह आलेल्या १४ जणांमध्ये वॉर्ड नं.१ (२), वॉर्ड नं. २ (१), वॉर्ड नं. ३ (१), वॉर्ड नं. ७ (३), नरसाळी (१), गजानन वसाहत (२), म्हाडा (३), सुतगिरणी (१) रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत २३०३ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४५३ जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. १११७ जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. आजपर्यत ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचा कारभार पाच दिवस बंद

श्रीरामपूर नगरपरिषदेत करोनाने शिरकाव केल्यामुळे पालिकेत घबराहट निर्माण झाली आहे. पालिकेत या संसर्गाचा प्रसार होवू नये म्हणून स्वच्छता, पाणीपुरवठा, रुग्णालय या अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचा सर्व कारभार पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here