कोपरगाव / प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
   
  आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राहुल चांदगुडे व संदीप कुटे हे नेहमीच रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना मदत करीत असतात. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चासनळी येथील मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक विद्यालयाला ५ लाख रुपये खर्च करून भव्य-दिव्य व्यासपीठ बांधून देण्यात आले आहे. या व्यासपीठाचे कर्मवीर शंकरराव काळे व्यासपीठ अये नामकरण देखील करण्यात आले आहे. यावर्षी देखील समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासत राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास २५ हजार रुपयाची देणगी देण्याचा निर्णय घेऊन या रक्कमेचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्राचार्या सौ.छाया काकडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचून गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने काळे परिवाराची तिसरी पिढी या शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. त्यांच्या कार्याला अल्पशी मदत म्हणून रयत शिक्षण संस्थेला मदत करीत असल्याचे राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिराच्या प्राचार्या सौ.छाया काकडे व त्यांचे सहकारी शिक्षक यावेळी उपस्थित होते.आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास मदतीचा धनादेश देतांना राहुल चांदगुडे व संदीप कुटे समवेत प्राचार्या सौ.छाया काकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here