कोपरगाव / प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आशुतोष काळे यांनी आमदार झाल्यानंतर लगेच सदर योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला तसेच सर्व दुरुस्त्या करून घेतल्याने उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू झाली असून पाझर तलावांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाझर तलावातील पाण्याचे आ . आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, बाबुराव थोरात, रोहिदास होन, किसन पाडेकर, के.डी. खालकर,अॅड. योगेश खालकर, सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, अनिल खालकर, अरुण कोल्हे, लक्ष्मण थोरात, नाना नेहे, ज्ञानदेव नेहे, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, सिकंदर इनामदार, अशोक नेहे, वाल्मिक वाकचौरे, निळवंडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. संघांनी, श्री. लव्हाटे, श्री. ढिकले आदी उपस्थित होते.
निवडणूक कालावधीत दिलेला शब्द खरा करून हा प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here