वाहनचालक व नागरिकांना त्रास; ग्रामपंचायतीला लक्ष देण्याची मागणी

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर तालुक्यातील महांकाळ वडगाव ते नागमठाण रस्ता या ठिकाणी १०० लोकांची वस्ती असणाऱ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था इतकी भयानक झाली असुन पावसाच्या पाण्यामुळे मोठे हाल झाले आहेत. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी जमा होत असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून आपले वाहन पुढे न्यावे लागत आहे.

त्याचप्रमाणे येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिक तसेच व्यापारी देखील या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहेत.

महांकाळ वडगाव ते नागमठाण या कडे जाणाऱ्या रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या ठिकाणी श्रीरामपुर शहरात सुद्धा ये-जा करण्यासाठी रोड नसून या वर लवकरात लवकर निर्णय घ्या असे स्थानिक नागरिकाचे म्हणणे आहे.

मात्र ते देखील अर्धवट पडल्यामुळे सर्व मातीत चिखल निर्माण होऊन तो रस्त्यात पसरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन नागमठाण कडे जाणारा रोड दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here