कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुभरी येथे गिरमेवस्ती शाळेत भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सहकार महर्षी श्री शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. या वेळी जालिदर चव्हाण, रामभाऊ वक्ते, ज्ञानेश्वर वक्ते, प्रा.मधुकर वक्ते, हनुमान मेहेत्रे, भगाभाऊ चव्हाण, मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका जोशी, अनुज दुमणे, गौतम गायकवाड, विश्वजीत वक्ते,आदी उपस्थित होते. या वेळी सहकार महर्षी श्री शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चंद्रभान वक्ते यांनी असे सांगितले की कोरोनाच्य काळात संगणक प्रणाली चा विद्यार्थींना चांगला उपयोग होतो. आज विद्यार्थी घरी बसुन चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात यांच श्रेय शिक्षक वृंदाना जात आहे. असे सांगितले. कोरोनाच्य पार्श्वभूमी कोणत्या ही प्रकारे कार्यक्रम घेतले नाही .सोशलडिस्टंनचे पालन केले.सुत्रसंचालन साळुंके सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका जोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here