माळवाडगांव / प्रतिनिधी (संदिप आसने) :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे चौऱ्याहत्तर व भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरणा व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग ठेवून विविध ठिकानी ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी प्रथम माळवाडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँकेचे ध्वजारोहन जेष्ठ संचालक भाऊसाहेब चिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र आदिक यांच्याहस्ते पार पडले. यावेळी व्हा.चेअरमन गोरख दळे,संचालक संजय आसने,बाबासाहेब आसने,दिलीप हुरुळे,नानासाहेब आसने,बँकेचे मॅनेजर रमेश पटारे,सचिन गवारे,सचिव रमेश जाधव,प्रदीप आसने,सतिश आसने,भाऊसाहेब आसने,रावसाहेब काळे,मच्छिंद्र दळे,संतोष थोरात,गणेश आसने,विठ्ठल बोर्डे,पाराजी काळे,शिवाजी आसने,पञकार विठ्ठलराव आसने यासह आदी उपस्थित होते, तर माळवाडगांव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण चेअरमन गिरीधर आसने यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ सोहेल शेख,बबन आसने,पञकार भाऊसाहेब काळे,डॉ इलियास पठाण,अशोक साळवे,बापुसाहेब आसने,अमोल मोरे,अनिल आसने,विठ्ठलराव कावरे,शरद आसने,पिंटु अनुसे,संजय आसने यासह आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर आसने यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी बबन आसने,बाळासाहेब आसने,सुनिल आसने पञकार संदिप आसने,जालिंदर चव्हाण,सुनिल पाचपिंड,विक्रम कहांडळ,धोंगडे,संगिता साळवे,सुनिता तोडमल,स्वाती बोबडे,मारीया साळवे यासह व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते तर न्यू इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण सरपंच बाबासाहेब चिडे व चेअरमन गिरीधर आसने यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज आदिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक गंगाधर नाईक,तंञस्नेही शिक्षक मुकुंद कालंगडे,मनिषा थोरात,मिना गायके,आशिक शेख,निता औताडे,शितल जवादे,सुजित राठोड,स्वाती गायकवाड,तुकाराम चौधरी,अविनाश आसने,दत्ता आदिक यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाला विद्यार्थी नसल्याची खंत वाटते – जठार

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमानुसार शाळेमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असल्याने विद्यार्थ्यांनादेखील शाळेमध्ये बोलावण्यात आले नाही, त्यामुळे भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन शाळेमध्ये विद्यार्थ्यांविना साजरा करावा लागत असल्याने मोठी खंत वाटते असे मनोगत मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here