माळवाडगांव/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगावचे भूमिपुत्र व भारतीय लष्कराचे जवान पंकज आढाव यांनी आज दि.१५ रोजी माळवाडगांव येथे मास्कचे वाटप करून ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला.
देशाच्या सीमेवर देखील भारतीय लष्कराचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करत आहे.तसेच आता संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी देखील भारतीय लष्कराचे जवान पंकज आढाव यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे,त्यांनी या संकटाचा सामना करून गावातील नागरिक सुरक्षित राहावे,यासाठी आज माळवाडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिशचे शिक्षक वृंद कर्मचारी व पत्रकार यांना मास्कचे वाटप करून ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.त्यांच्या या कृतीबद्दल माळवाडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कचेश्वर जठार न्यू इंग्लिश स्कूलचे मुकुंद कालंगडे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here