श्रीरामपुर/प्रतिनिधी :- दत्तनगर च्या नागरिकांच्या विविध समस्या साठी भीमशक्ती चे व परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक ला घेरावा चा इशारा देण्यात आला होता पण ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने सरपंच सुनील शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे ग्रामपंचायत सदस्य अरुण वाघमारे किरण खंडागळे आरपीआय तालुकाध्यक्ष राजू मगर तालुका संघटक संजय बोरगे सुनील संसारे सचिन खांडरे सुरेश शिवलकर राजू गायकवाड प्रदीप कदम आदींनी दिले यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर मध्ये नागरिकांना कोरोना पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्या वाटप करावे साफसफाई करावी उघड्या गटारी वर बीसी पावडर मारावी सर्वत्र कचरा साचला असून घंटागाडी चालू करण्यात यावी घरकुल व शौचालय प्रकरण प्रलंबित असून लवकर मार्गी लावावे दलित वस्ती अंतर्गत कामे करावे कोरोना काळात अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचे मानधन रखडले असून ते त्वरित देण्यात यावे लाईट चालू करण्यात यावे सर्व रस्ते फुटले असून दुरूस्ती करावे व शुद्ध पंप जल केंद्र योजनांतर्गत पाण्यासंदर्भात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संबंधितावर वर कारवाई व्हावी असे अनेक प्रकारचे निवेदन देण्यात आले व नागरिकांचे प्रश्न लवकर मार्गी लागल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here