कोपरगाव प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विद्यार्थी देखील शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेले पाहिजेत.यासाठी या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्वप्रकारची मदत जिल्हा परिषद .पंचायत समितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी आमदार आशुतोष काळे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.त्यांच्या मार्गदर्शनातूनच पात्र लाभार्थी दिव्यांगांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने यांच्या हस्ते विविध साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे. यामध्ये १० श्रवण यंत्र, १५ एम.आर. किट, ६ व्हीलचेअर (छोटी), ३ व्हील चेअर (मोठी), ५ रोलेटर, ९ कॅलियर, ५ सी.पी. चेयर आदी साहित्याचा समावेश आहे.
तसेच वारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांच्या सेस फंडातून उक्कडगाव येथील ४० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी जी.प.सदस्य राजेश परजणे, कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, गटशिक्षण अधीकारी पोपट काळे, नानासाहेब निकम,रवींद्र निकम, हिरामण गुंजाळ आप्पासाहेब निकम,राजेंद्र निकम,नानासाहेब बागुल, नानासाहेब त्रिभुवन, बाळासाहेब निकम, सचिन निकम,किरण निकम, मधुकर निकम सर्व केंद्र प्रमुख, लाभार्थी विद्यार्थी आदी व त्यांचे पालक उपस्थित होते. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पात्र लाभार्थी दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करतांना सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here