वाहनचालक व नागरिकांना त्रास; प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शिर्डी शिंगणापूर बायपास म्हणून ओळखला जाणारा रस्ता श्रीरामपूर एम.आय.डी.सी पासून ते गणेशनगर पर्यंत १५ कि.मी. इतका आहे. ह्या रस्त्यावर अनेक मोठ मोठी खड्डे पडली आहेत. आतापर्यंत मोठी आंदोलने झाली असून या रस्त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अहमदनगर हे जबाबदारी घेत नसल्याने पालकमंत्री मुश्रीफ साहेब व श्री शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे साहेब यांना देखील निवेदन देण्यात आले. या रस्त्यावरची परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटी गाठी ही चालू आहेत. .

शिर्डी शिंगणापूर बायपास म्हणून ओळखला जाणारा रस्ता श्रीरामपूर एम.आय.डी.सी पासून ते गणेशनगर पर्यंत १५ कि.मी. इतका जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था इतकी भयानक झाली असुन पावसाच्या पाण्यामुळे मोठे हाल झाले आहेत. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी जमा होत असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून आपले वाहन पुढे न्यावे लागत आहे.


तसेच व्यापारी देखील या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी प्रशासनाला याबाबत तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहेत.

एम.आय.डी.सी पासून ते गणेशनगर कडे जाणाऱ्या रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या ठिकाणी गणेशनगर मधुन श्रीरामपुर शहरात सुद्धा ये-जा करण्यासाठी रोड नसून या वर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी सांगितले आहे

दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी वेगवेगळे आंदोलने करून या रस्त्यासाठी आवाज उठवला व त्याला आम आदमी पार्टी चे तिलक डुंगरवाल उत्तर महाराष्ट्र आर पी आय चे अध्यक्ष राजाभाऊ कापसे भिमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर दत्तनगर गावचे सरपंच सुनील शिरसाठ विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील असंख्य लोकांच्या पुढाकारा मुळे हा प्रश्न तडीस नेल्या शिवाय गप्प बसणार नाही अशीच खात्री या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या सर्व सामान्य माणसाला अशोक लोंढे यांनी बोलताना दिली व असाच पाठपुरावा जोरदार चालू राहील जोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहु याविषयावर पालकमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे साहेब यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचे निवेदन सुद्धा दिले भेटी प्रसंगी सिद्धार्थ सिसोदे आर पी आय मराठा आघाडीचे राज्य संघटक, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, उमेश आमटे, जनार्दन जायभाय आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here