श्रीरामपूर (प्रतिनिधी संदिप आसने) :- श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा बाजार मध्ये बुधवारी ९८१६ कांदा गोण्यांची आवक झाली. उत्तम प्रतीच्या कांद्याला २४०० रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला,गेल्या आठवड्यात हे भाव एक हजार रुपयांवर गेले होते. मात्र आवक कमी झाल्याने बाजार भाव काही प्रमाणावर वाढले आहे.

उत्तम प्रतीच्या कांद्याला १९०० ते २४०० रुपये, दोन नंबर कांद्याला १००० ते १८५० रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते ९५० रुपये तसेच गोल्टी कांद्याला १२०० ते १८०० रुपये पर्यतचा भाव मिळाला.दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू,आंध्रप्रदेश या राज्यातून कांद्याला चांगली मागणी होत आहे.मात्र २५ ते ३० हजार कांदा गोण्याची होणारी आवक आता १० ते १५ हजार गोण्यांवर आली आहे.त्यामुळे बाजार भावात देखील सुधारणा होत आहे.श्रीरामपुर बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार व शुक्रवार असे कांद्याचे लिलाव होत आहे. तसेच या वाढलेल्या बाजार भावामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण दिसून आले, मागील काही दिवसात कांद्याच्या भावात सतत घसरण होत होती त्यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त झाले होते मात्र आता कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here