कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणच्या वतीने शिर्डी येथे आरोग्य विभागात आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असलेल्या जयश्री सोळके यांचा सत्कार करण्यात आला.जयश्री सोळके या साईनाथ हाॅस्पीटल शिर्डी येथे परीचारीका या पदावर कार्यरत आहेत.त्यांनी आठ दिवस कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णाची सेवा केली असुन आता त्या आपल्या जेऊर कुंभारी गावात परत आल्या आहे.या पार्श्वभूमीवर जेऊर कुंभारी गावातील शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुधाकर वक्ते ,उपअध्यक्ष विशाल गुरसळ , सचिव महेश सोळके यांच्या हास्ते जयश्री पोपट सोळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, बोलताना असे म्हणाले की रूग्णांची सेवा करणारे डाॅक्टर नर्स,पोलिस, सफाई कामगार,हे देवदुतच आहे. हेच खरे कोरोना योध्दा असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे माजी अध्यक्ष प्रदिप गायकवाड म्हणाले की आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्याच्या अविरत सेवेमुळे कोरोना महामारीशी दोन हात करण्यात आपण यशस्वी होत आहोत.तरी पण लोकांनी आपली व कुटुंबांची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे- उपअध्यक्ष विशाल गुरसळ , पोपट सोळके,बाळासाहेब सोळके, दिनकर सोळके, राहुल चव्हाण, राहुल वक्ते, महेश सोळके, ॠषी गुरसळ, ॠषी सोळके, विक्रम चव्हाण, किरण चव्हाण, साईराम सोळके, गौतम गायकवाड, ॠषीकेश वक्ते,राहूल देवकर, विकी जगताप, कुलदीपक वक्ते,विश्वजीत वक्ते , साईनाथ वायकर, संतोष वक्ते, शरद चव्हाण, खंडू गांगुडे, सुदर्शन कवडे, गौरव पवार, गौरव गायकवाड, सौरभ पवार,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here