श्रीरामपुर/प्रतिनिधी :- मनसे चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना श्रीरामपूर येथील संत लूक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.


कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, त्याची आज सकाळी चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल पोझिटीव आला आहे. तर त्याच्या संपर्कातील त्यांच्या पत्नी याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. असे बाबासाहेब शिंदे यांनी सांगितलं आहे.

तसेच गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वानी कृपया लक्षणे आढळल्यास तुरंत चाचणी करावी, आणि विलगीकरण बाळगावे अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here