श्रीरामपूर (प्रतिनिधी संदीप आसने) :- तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते मला माहित नाही, राज्यातील तीन पक्षांचे सरकार किती दिवस टिकेल ? धरणाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.पाच मिनिटे तीन चाकी रिक्षा चालवून स्वतः अनुभव घेतला अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते,वेगावर नियंत्रण ठेवून सर्व पाहावे लागते.तीन चाकी सरकारमध्ये बसलेले लोक घाबरलेले आहेत,अशी टीका त्यांनी श्रीरामपूर मध्ये राज्य सरकारवर केली.

डॉ.विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयात आज कोरोना तपासणी केंद्राचा शुभारंभ झाला, त्यासाठी विखे पाटील समर्थकांनी मागणी केली होती.

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आज दि.१९ रोजी दुपारी श्रीरामपूर येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे,सभापती संगीता शिंदे,माजी सभापती नानासाहेब पवार, गिरीधर आसने,भाऊसाहेब बांद्रे,केतन खोरे,संदीप चव्हाण,शंतनू फोफसे,जनसंपर्क कार्यालयाचे प्रकाश पारखे यासह आदी उपस्थित होते.

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयापर्यंत तीन चाकी रिक्षा चालवून राज्यातील तीन पक्षाच्या सरकारवर टीका केली.

यावेळी खा.डाॅ.सुजय विखे पाटील म्हणाले, तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते, मला माहित नाही राज्यातील तीन पक्षाचे सरकार किती दिवस टिकेल? कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पाच मिनिटे तीन चाकी रिक्षा चालवून मी स्वतः अनुभव घेतला, अनेक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते, वेगावर नियंत्रण ठेवून सर्व पहावे लागते.तीन चाकी सरकारमध्ये बसलेले लोक घाबरलेले आहेत.त्यामुळे हे सरकार स्थिर राहणे अवघड आहे. राज्य सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप नुसकान भरपाई मिळाली नाही,असे खा.विखे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here