कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा कपाशी पिकांचा पीक विमा मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊन २०१९-२० या वर्षाच्या कपाशी पिक विम्याचे१ कोटी ८६ लाख रुपये व २०१८-१९ या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे ५ लाख असे एकूण पिक विम्याचे१ कोटी ९१ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका, कोपरगाव, पोहेगाव,सुरेगाव व रवंदे या पाचही महसूल मंडलातील असंख्य शेतकऱ्यांनी मागील वर्षी २०१९/२० मध्ये कपाशी पिकांचा विमा भरलेला होता. या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन पिक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला.यामध्ये मागील वर्षीच्या कपाशी विम्याचे १ कोटी ८६ लाख व २०१८ च्या ज्वारी पिक विम्याची ५ लाख २७ हजार असा एकूण १ कोटी ९१ लाख २७ हजार रुपये पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सर्व मंडलातील एकूण २ हजार ३५० शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात ७० लाख रुपये ठिबक सिंचन अनुदान दिले असून हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील शासनाने शेतकऱ्यांना दिली असून पुन्हा एकदा पीक विम्याची रक्कम देऊन शेतकऱ्यांबाबत अतिशय चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here