जेऊर कुंभारी / प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव नगरपालिका हद्दीतील दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर बेट हे जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर असलेले ठिकाण असून या भागास तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत विषय घेऊन चर्चा करावी अश्या आशयाचे निवेदन आज १९ ऑगस्ट रोजी गोदामाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नागरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी नगरपालिकेला विनंती केली की कोपरगाव शहरातून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यालगत असलेले दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी वास्तव्य करत तप केलेला परिसर म्हणून बेट भाग ओळखला जातो. आज या परिसरात गुरू शुक्राचार्य, कचेश्वर, विष्णू, संजीवनी विद्यापार हे मंदिर असून अनेक इतिहास कालीन पौराणिक धर्म ग्रंथामध्ये या भागाचा उल्लेख सापडून येतो. या ठिकाणी विवाह करण्यास कोणत्याही प्रकारचा मुहूर्त लागत नाही.याच ठिकाणी नारायण नागबळी, त्रिपिंडी,कालसर्प योग, सत्यनारायण महापुजा या धार्मिक पुजा करण्यासाठी दररोज भाविकांची वर्दळ असते त्या मुळे या भागाला अनन्यसाधारण महत्व आहे.

तरी वरील सर्व ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाचे स्थान कोपरगाव शहरात आहे, परंतु शौकांतीका अशी की अजूनही शासन दरबारी हे क्षेत्र दुर्लक्षित असून या ठिकाणास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा या अनुषंगाने आपण येणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करत योग्य तो प्रस्ताव करून सभेत मंजुरी घेत तो शासन दरबारी पाठवून हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावा या साठी प्रयत्न करावे जेणेकरून हे जर झाले तर बेट भागासोबत कोपरगाव शहराचा कायापालट होऊ शकतो आणि आर्थिक व रोजगार संबंधी चालना मिळून विकास होऊ शकतो असे निवेदन आदिनाथ ढाकणे यांनी दिले आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here