कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- मा.तहसीलदार साहेब कोपरगाव व मा.शहर पोलीस निरीक्षक साहेब कोपरगाव पोलीस स्टेशन व मा.नगराध्यक्ष साहेब कोपरगाव नगरपालिका व मा.मुख्याधिकारी साहेब यांना कोपरगाव जिम असोसिएशन यांच्या वतीने जिम चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मागील ५ महिन्यानं पासून शहरातील जिम बंद आहे तरी जिम व्यावसायिक हतबल झाले आहे. जिम व्यावसायिकांनी जिम व्यवसाय चालू करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहे. व काही भागभांडवल बँकेकडून किंवा खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन व्यवसाय चालू केला आहे. तरी पाच महिन्यापासून बँकेचे हफ्ते हे घरातून भरावे लागत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर जिम चालू करण्याची परवानगी द्यवी. अन्यथा जिम चालकांना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी महिन्याला १० हजार रुपय द्यावे. तरी शासनाने आज दि.२०/८/२०२० पासून एस.टि. बस सेवा चालू केली आहे. तसेच शासनाने वाईन शॉप व परमिट रूम चालू केले आहे. कारण शासनाला यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे शासनाला राज्य चालवणे शक्य होते. त्याचप्रमाणे आम्हाला देखील जिम चालू करण्याची परवानगी मिळावी. त्यामुळे आमचाही घरगाडा चालण्यास मदत होईल. अन्यथा आठ दिवसांनी पुन्हा तहसिल कार्यलयासमोर उघड्यावर जिम मारो आंदोलन करण्यात येईल. तरी शासनास नम्रपणे विनंती करतो की जिम व्यावसायिकांना जिम चालू करण्यास परवानगी द्यावी हि नम्र विनंती.या निवेदनावर शरद खरात, संजय सूर्यवंशी, अभय हलवाई, चंद्रकांत जगदाळे, ऋषिकेश ससाणे, राहुल गायकवाड, राजू लोखंडे, मनोज पवार, सोमनाथ ताकवले , सुजल चंदनशिव, प्रतीक कावळे व अनिल जाधव इत्यादीच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here