जगभराला अडचणीत आणणारे कोरोनाचे संकट श्रीरामपूर शहरात गडद झाले आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील संशयित नागरिकांच्या स्वॅब टेस्ट करण्याचा ठराव करून नागरिकांना मोफत स्वॅब टेस्ट (RT-PCR) करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा नियोजन समिती, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.
याबाबत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना दिलेल्या निवेदनात खोरे यांनी म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना कोरोना स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट चार ते पाच दिवसांनी मिळत आहे. रिपोर्ट उशिरा मिळत असल्याने अनेक रुग्णांना इलाज सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या संपर्कातील अनेकांना कोरोना लागण होण्याची शक्यता वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका, शिर्डी नगरपंचायतीने तेथील नागरिकांच्या कोरोना टेस्टिंगची सुविधा करून टेस्टचा खर्च उचलला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना अवघ्या २४ तासात रिपोर्ट मिळत आहे. त्याप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील नागरिकांचा कोरोना स्वॅब टेस्टिंगचा खर्च गरजेचे आहे. लवकर ईलाज सुरू झाल्यास रुग्णांची जीवितहानी होणार नाही.
श्रीरामपूर शहरातील नागरिक वर्षानुवर्षे नगरपालिकेस पाणीपट्टी, गाळापट्टी, घरपट्टीमधील संकलित कर, शिक्षण कर, विशेष शिक्षण कर, स्वच्छता कर, रोजगार हमी कर अशा विविध करांच्या माध्यमातून पैसे देत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची निगा नगरपालिकेने राखणे गरजेचे आहे.
तरी येत्या २७ ऑगस्ट २०२० रोजी होत असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र.३३ मा.अध्यक्षा यांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळच्या विषयात “श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या कोरोना स्वॅब टेस्ट नगरपालिकेतर्फे मोफत करण्याचा निर्णय घेणे” हा विषय घेऊन सर्वानुमते मंजूर करावा व शहरवासीयांसाठी ही सुविधा सुरू करावी अशी मागणी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here