माळवाडगांव (प्रतिनिधी संदिप आसने) श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील जागृत देवस्थान असणाऱ्या भवानी देवी मंदिरात आज दि.२० रोजी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना पहाटे ५:३० वाजे दरम्यान ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे,ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील देवीभक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने दररोज पुजारी पहाटे दैनंदिन महापुजा आरती, सायंकाळच्या आरतीसाठी व साफसफाईसाठी मंदीर उघडले जात आहे.दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी दिवाबत्ती आरती झाल्यानंतर आज गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास पुजारी महेश रत्नपारखी मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. भवानी देवी ट्रस्ट अध्यक्षा डॉ.सुनिताताई आसने ,सरपंच बाबासाहेब चिडे, माजी सरपंच डॉ नितीन आसने,पोलीस पाटील संजय आदिक, गावातील प्रमुख कार्यकर्ते,पत्रकार तातडीने घटनास्थळी हजर झाल्यानंतर पोलीसांना खबर देण्यात आली.पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी पोलीसांकडून करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब मोरे अशोक पवार, संदिप पवार, पठाण हे पुढील तपास करीत आहे.
यासंदर्भात विश्वस्त बाळासाहेब हुरूळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्या नंतर दानपेटीचेही कुलूप तोडून अंदाजे रोख रक्कमेसह देवीच्या नाकातील सोन्याची नथ, अंदाजे ३५०० रूपये किंमत चांदिची एक वस्तू अंदाजे किंमत १ हजार रूपये असा एकूण ४५०० रूपयांचा ऐवज चोरिस गेलेला आहे.दान पेटीतून चोरट्यांनी नोटाच उचलल्या ; चिल्लर जागेवर
भवानी देवी मंदिरात चोरट्यांनी चोरी करतांना देखील दान पेटीतून नोटाच उचलल्या मात्र एक,दोन,पाच, दहा रुपयाचे नाने जागेवर ठेवले तसेच देवीच्या गळ्यातील नकली दागिण्यांना देखील हात लावला नाही मात्र देवीची नथ चोरी केली, त्यामुळे चोरट्यांना मंदिरातील माहीती असावी असा संशय ग्रामस्थ व देवीभक्तांमधुन व्यक्त केला जात आहे.
हे जागृत देवस्थान असून देवी या चोरट्यांना नक्कीच चमत्कार घडविल्या शिवाय राहणार नाही असेही देवी भक्तांची चर्चा माळवाडगांव परिसरात सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here