श्रीरामपूर – वंचित बहुजन आघाडीचे नेते आडव अड प्रकाश आंबेडकर यांनी १२ तारखेला महाराष्ट्रातील एसटी बस सेवा सुरू कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन केले होते. याच आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत सार्वजनिक वाहतूक सेवा व एसटी बस सेवा चालू केली. आज राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस जिल्ह्याबाहेर चालू केल्या आहेत याची दखल घेत श्रीरामपूर येथील वंचित बहुजन आघाडी वतीने वाहक चालक व स्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, प्रकाश सावंत, तुकाराम धनवडे, सुगंधराव इंगळे, आनंद मेढे, गौतम राऊत, अमोल सोनवणे आदी उपस्थित होतो. आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड बस स्थानकात कर्तव्यावर आलेल्या सर्व वाहक-चालक कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here