कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगावात तालुक्यातील माजी आमदार अशोक दादा काळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल व आशुतोष दादा काळे मित्र मंडळ चांदेकसारे यांच्या कडून चांदेकसारे आरोग्य उपकेंद्र व साई स्वामी हाॅस्पीटल,सोनाई हाॅस्पीटल चांदेकसारे येथे PPE किट चे वाटप करण्यात आले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चांदेकसारे उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये कोरोना रूग्ण आढळून आले , त्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या सर्व कर्मचारी व चांदेकसारे मधील डाॅक्टर श्री विजय होन व डाॅक्टर रोकडे हे देखील रूग्ण सेवा करत आहेत, रूग्णांची सेवा करत असताना आपण ही या डाॅक्टर रूपी रूग्णांसाठी देव समजले जाणारे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे आपण सामाजिक देणे लागतो या हेतूने जिजाई बहहूउद्देशिय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव होन व सचिव श्री सुनिल होन यांनी माजी आमदार अशोक दादा काळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने PPE कीट चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी भैय्यासाहेब शेख,रासप चे अल्पसंख्याक सेलच्या चे प्रदेशाध्यक्ष सय्यदबाबा शेख,आर आर पाटील होन, नुरमोहम्मद शेख, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष श्री भास्करराव होन, डाउच चे ग्रा पं सदस्य श्री शंकरराव गुरसळ, बाबासाहेब होन,पंकज होन,शरदराव होन,संतोष (जालिंदर) होन,जोगेश्वरी स्कूल चे सचिव श्री सुनिल होन,बाळासाहेब रोकडे, सत्यवान होन, जोगेश्वरी स्कूल चे व्यवस्थापकीय संचालक श्री सागर होन व शुभम पवार आदी उपस्थित होते.
यावेळी चांदेकसारे आरोग्य उपकेंद्राच्या CHO सौ. डाॅ. अरूणा गाताडे मॅडम,सौ.डाॅ भुंताबरे मॅडम,डाॅ श्री मोरे सर,तसेच आरोग्य सेविका सौ. सोनी खरात, सौ.नलिनी जगताप, सौ. सिमा पवार. सौ. लता होन,सौ.रोहीनी जगताप व सर्व स्टाप उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here