श्रीरामपुर/प्रतिनिधी :- दत्तनगर गावातील आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका पत्रकार ग्रामपंचायत कर्मचारी दत्तनगर येथील पोलीस कर्मचारी यांनी लॉकडाऊन काळात त्यांनी जिवाची पर्वा न करता काम केले त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे योगदान तसेच सहभाग व सहकार्याबद्दल दत्तनगर परिवर्तन आघाडीच्यावतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बुके देऊन सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ खालील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला

या कार्यक्रमाप्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चे अधीक्षक वसंत जमदाडे हे अध्यक्षस्थानी होते व यांनी बोलताना कर्मचारी यांच्या तुम्ही सत्कार केला बद्दल त्यांच्यावर कौतुकाची थाप पडल्याने निश्चित कामामध्ये त्यांना उभारी मिळेल दत्तनगर गावात लोकहिताच्या कामासाठी सदैव सहकार्य राहील त्यानंतर बाबासाहेब काळे उद्योजक यांनी मार्गदर्शन करताना दत्तनगर परिवर्तन आघाडीच्या कामाचे कौतुक करताना सामाजिक शैक्षणिक कामात नेहमीत पुढाकार असतो त्यांना माझे नेहमी सहकार्य राहील असे म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी मसुटा मराठी चित्रपट दिग्दर्शक भरत मोरे जि प चे बाबासाहेब दिघे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील सरपंच सुनील शिरसाठ आरपीआय चे सुभाष त्रिभुवन तंटामुक्ती अध्यक्ष रवी आण्णा गायकवाड डॉ विवेक बागले डॉ सचिन कांबळे डॉ विशाल भालेराव पोलीस पाटील अनिल गायकवाड ॲड अजित उघडे सुनील जगताप सर सुनील उबाळे सर ग्र प सदस्य संदीप बागुल सुरेश जगताप अरुण वाघमारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते

तर कार्यक्रमासाठी दत्तनगर परिवर्तन आघाडी चे अध्यक्ष संदीप मगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अध्यक्ष चे सूचना किरण खंडागळे ग्रा प सदस्य यांनी मांडली तर अनुमोदन संजय बोरगे यांनी केले

सूत्रसंचालन अशोक लोंढे यांनी केले यावेळी सुनील संसारे, स्वप्निल सोनार, राजेंद्र मगर, सोपान मोरगे, संदीप गायकवाड, सुरेश शिवलकर, संदेश कदम, विश्वास भोसले, राजुशेठ वाधवानी, संजय थोरात, सुरेश काकडे, सचिन खांडरे, मुन्ना पठाण, बाबा बनसोडे, बाळासाहेब बागुल, नयन शिरसागर, बबन माघाडे, व मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कोरोना मध्ये मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
शेवटी आभार मा. उपसरपंच संजय जगताप यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here