श्रीरामपुर/प्रतिनिधि :- श्रीरामपूर येथील संत लूक हॉस्पिटल मधील कॉविड सेंटर गेल्या तीन महिन्यापासून सुरू झालेले असून काही दिवसापूर्वी अनेक लोकांच्या सुख-सुविधा संदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या असता आम्ही त्याची माहिती घेतली असता त्या ठिकाणी सकाळी स्नान करण्यासाठी गरम पाणी व पिण्यासाठी गरम पाणी उपलब्ध होत नसल्याने तेथील स्वच्छतेचा सुद्धा अभाव आहे तरी आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण समक्ष जाऊन तेथील पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन करावे व रुग्णांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर बरे वाटेल व कोरोनासारख्या साथी रोगावर लवकरात लवकर मात करून आपल्या घरी जाता येईल तरी मा. प्रांत साहेबांनी कॉविड सेंटरला जो निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सुख- सुविधेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कॉविड सेंटरला सुखसुविधा उपलब्ध होतील असे न झाल्यास मनसेच्या वतीने येत्या ८ दिवसात धरणे आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी अनिल पवार साहेब यांना देण्यात आली त्या प्रसंगी मनसे जिल्हासचिव डॉ संजय नवथर, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहर अध्यक्ष सचिन पाळंदे, मनविसे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुकाअध्यक्ष मनविसे विकी राऊत, उपशहर अध्यक्ष राजु शिंदे, उपतालुकाअध्यक्ष मनविसे राहुल दातीर तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here