रांजणखोल(वार्ताहर) भाऊसाहेब जाधव :- राहाता तालुक्यातील रांजणखोल भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध उत्पादक शेतक-याच्या दुधाला प्रती लिटर ३० रु भाव मिळाला पाहिजे व प्रती लिटर १०रु अनुदान मिळाले पाहिजेत तसेच शेतक-यांच्या तयार केल्याल्या दुध पावङरीस प्रती कीलो ५० रु अनुदान दिले पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रे पाठविण्यात आले आहे या निष्क्रीय महाविकास आघाङीने दखल घेतलेली नाही झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपाच्या वतीने महादुध एल्गार आंदोलनं पुकारण्यात आले आहे त्या अनुषंगाने रांजणखोल भारतिय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी १०१ पत्र पाठविण्यात आले आहे हे पत्र वाचुन सुस्त झालेल्या सरकारला आता तरी जाग येईल यासाठी रांजणखोल येथील दुध उत्पादक व भारतीय जनता पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री यांना पत्र लिहून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे याप्रसंगी मुळा प्रवरेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे,ऊपसरपंच परविन शेख,सरपंच चांगदेव ढोकचौळे,माजी ऊपसरपंच बाळासाहेब ढोकचौळे,राजु गायकवाङ,निलेश जाधव,सिद्धार्थ बागुल,गणेश आवारे,अनिल ढोकचौळे,लक्ष्मण कुलथे,दत्तु अभंग,प्रकाश शिरसाठ, बि.के ढोकचौळे,आबा नरोङे,रेशन दुकानदार राजु नरोङे,गंगाधर ढोकचौळे,बाळासाहेब आलिगुंङे, यांच्यासह दुध उत्पादक शेतकरी उपस्थीत होते