सहाय्यक निबंधक अहवाल केला अमान्य

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- टिळकनगर परिसर उद्योग समुहाच्या पतसंस्थेत संचालक मंडळाला क्लिनचीट देणारा अहवाल सहाय्यक निबंधक व्ही. यु. लखवाल यांनी अमान्य केला आहे पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी लाखो रुपये आगाऊ उचलल्याची तक्रार संचालक शांतवन सोनवणे यांनी केली होती

संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी सन २०१७-२०१८ ते २०२० या कालावधीत आगाऊ रक्कम उचलून त्या रकमा परत भरणार केल्या नाहीत त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले अशी तक्रार करण्यात आली होती त्यानुसार या प्रकरणी ऍड. अरविंद मुळे यांनी सहकारी संस्था अधिनियम १६० च्या कलम ८३ अन्वये चौकशी करून अहवाल सादर केला होता निबंधक लखवाल यांनी अहवालाचे अवलोकन करून काही निरिक्षणे नोंदवली त्यानुसार किती संचालक व अधिकाऱ्यांनी रक्कम आगाऊ उचलल्या त त्यांचा नावानिशी उल्लेख अहवालात आढळून आला नाही व्यवस्थापन एन एस भालेराव व पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विघे या दोनच व्यक्तींची सुनावणी झाल्याचे लखवाल यांनी म्हटले आहे तक्रारदार शांतवन सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा त्यात समावेश नसल्याने लखवाल यांनी म्हटले आहे त्याचबरोबर अध्यक्ष व चौकशी अधिकारी यांनी दर्शविलेल्या रक्कमेत तफावत दिसून येत असल्याचा अभिप्राय लखवाल यांनी नोंदविला आहे त्यामुळे अहवाल माघेम स्वरूपाचा असल्याने तो अमान्य केल्याचे पत्र लखवाल यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दिले आहेत याबद्द्ल बोलताना त्यांनी दुजोरा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here