श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- श्रीरामपूर शहरालगद पुर्णवादनगर भागात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी जखमी झाल्याची घटना काल रात्री १:३० ते २ वाजेदरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील बाबासाहेब गोरक्षनाथ भोंगळ यांच्या घराशेजारी (गट नं.८४) गोठ्यात बांधलेल्या ४ शेळ्यापैंकी एका शेळीवर काल रात्री १:३० ते २ च्या दरम्यान बिबट्याने अचानक झडप घातल्याने गोठ्यातील गायी व शेळ्यांच्या आवाजाने बाबासाहेब भोंगळ हे जागी झाले, त्यांच्या ओरडल्याने परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतल्याने शेळीचे प्राण वाचले. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जवळच असलेल्या उसात धाव घेतली.श्रीरामपूर शहरालगतच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकही धास्तावले आहे.त्यामुळे या परिसरात वनविभागाने पिंजरा लावुन बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here