कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगांव शहरात एक गांव एक गणपती उत्सवात आजची सकाळची आरती सूर्यतेज संस्थेचे सल्लागार सदस्य बंडूनाना चिंचपुरे या दांपत्याचे शुभहस्ते करण्यात आली आहे.

कोपरगांव शहरात एक गांव एक गणपती उत्सव सुरु आहे. या उत्सव काळात कोविड योद्धे, कोविड संकट काळात मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांना सकाळ व सायंकाळ श्री गणेश मुर्ती पुजेचा मान देण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून एक गांव एक गणपती उत्सवाची आजची सकाळची श्री गणेश पुजा व आरती सूर्यतेज संस्थेचे सल्लागार सदस्य बंडूनाना चिंचपुरे व विविध सेवाभावी गणेश मंडळे यांचे प्रतिनिधी चहाची मदत देणारे संभाजी जाधव,विघ्नेश्वर वाहतूकदार रिक्षा संघाचे दशरथ कुंढारे,शंभोराजे माल वाहतूक संघटनेचे नितीन शेलार,छत्रपती प्रतिष्ठानचे रणवीर लोट,माता वैष्णोदेवी ग्रुपचे सनी वाघ यांचे शुभहस्ते करण्यात आली.
सूर्यतेज सल्लागार सदस्य बंडूनाना चिंचपुरे हे वृक्षप्रेमी आहेत.सन २०१३ साली गोदावरी नदी सार्वजनिक स्वच्छता अभियान,अनेक ठिकाणी वृक्षारोपण,सूर्यतेजच्या सार्वजनिक उपक्रमात योगदान देत असतात.
कोरोना संसर्ग प्रादुर्भाव निर्मुलन अभियानात सूर्यतेज संस्थापक व कोविड योध्दा सुशांत घोडके सर यांचे मार्गदर्शनाखाली सहा महिण्यापासून गरजुंना विविध सेवा पुरवली जात आहे. लोकसहभागातून जनजागृती,परराज्यातील पायी वाटसरु मजुरांना अन्नपुरवठा,आपत्ती मदतकार्य, गरजुंना किराणा,कोविड केअर सेंटरला नास्ता व पाणी या गरजुंना सह विविध सेवा पुरविण्यात सूर्यतेजच्या सदस्य सहा महिण्यापासून अहोरात्र आघाडीवर काम करत आहे. सूर्यतेज सह विविध संस्था व वैयक्तिक मदतकार्य करण्यासाठी सर्वच सेवेत आहे.अशा सर्वांना एक गांव एक गणपती उत्सवात मान देण्यात येत आहे. या प्रसंगी सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके, कोपरगांव नगरपालिकेचे नोडल अधिकारी महारुद्र गालट,राजेंद्र गाढे,चंद्रकांत साठे,मारुती काटे,कौस्तुभ चिंचपुरे आदिंसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.पौरोहित्य वैभवशास्त्री जोशी,विलास जोशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here