श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पत संस्था मर्या टिळकनगर या संस्थेचे चेअरमन म्हणून मी दिनांक ०१/०४/२०११ पासून संस्थेचा कारभार पाहत आहे तरी माझ्या कालखंडामध्ये जे काही संस्थेचे ऑडिट झालेले आहे ते सर्व “अ” वर्गातले आहेत संस्थेच्या सभासदांना त्यांच्या गरजेनुसार योग्य त्या पद्धतीने कर्ज वाटप होत आहे सभासदांच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज वाढ केली आहे तसेच सभासदांच्या अडचण पाहून सर्वसाधारण कर्जात व तातडी कर्जात वाढ केलेली आहे त्यानंतर मालक संस्थेकडे अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या रकमा माझे कार्यकाळात वसूल केलेला आहेत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवल्या आहेत मालक संस्थेतून सभासद सेवानिवृत्त होत असताना सभासद संकेत वाढ होण्यासाठी मालक संस्थेतील सीटीसी अंतर्गत कामगारांचे कामगारांसाठी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करून सीटीसी अंतर्गत कामगारांना सभासद करून घेतले संस्था चालवत असताना सहकार कायदा 1960 नुसार कोणत्याही प्रकारे नियमाचे उल्लंघन न करता संस्थेचे कामकाज योग्य प्रकारे चालू आहे

असे असतानाही संस्थेबद्दल तक्रारदार यांनी दिनांक २४/०८/२०२० चे दैनिक सार्वमत मधील बातमीत उल्लेख केलेली रक्कम रुपये ७७ लाख ५६ हजार ९०० एवढी दाखवलेले आहे ती रक्कम खोटी असून सभासद व संस्थेची बदनामी करणारी आहे सदर रक्कम भरणा केलेला आहे परंतु काही तक्रारदार सभासद यांच्याकडून संस्थेची पुढील निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता माझी व संस्थेची बदनामी करण्याचे कारस्थान चालू आहे सदर बातमी चा विचार करता मी तक्रारदार यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे तसेच मा. सहाय्यक निबंधक साहेब श्रीरामपूर यांनी नेमणूक केलेले चौकशी अधिकारी ऍड मुळे साहेब यांनी चौकशी करून अहवाल दिलेला आहे परंतु सदर अहवाल मा. सहाय्यक निबंधक साहेब यांनी अपेक्षित नमुन्यात नसल्याने तो अमान्य केलेला आहे परंतु हा अहवाल फेटाळला आहे हे तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे मा. सहाय्यक निबंधक साहेब यांच्या स्तरावर चौकशी कामकाज चालू आहे तरी मी चेअरमन या नात्याने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे बाळासाहेब विघे यांनी काढलेल्या पत्राकात म्हंटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here