श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरातील शनिशिंगणापूर बायपास रस्त्याची चाळण झाली असुन सदर विभागाने तातडीने रस्त्यांची कामे करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे.

आतापर्यंत या रस्त्यासाठी अशोक लोंढे यांनी अनेक आंदोलने केली असून या रस्त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अहमदनगर हे जबाबदारी घेत नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब व श्री शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे साहेब यांना देखील निवेदन देण्यात आले. या रस्त्यावरची परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासुद्धा भेटी गाठी चालू आहेत. .

दत्तनगर ते गणेशनगर हा रस्ता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे आहेत.की अजुन कोणाकडे आहे यांची माहिती मिळत नसल्याने रस्त्यांची कामे दर्जेदार होत नाही म्हणून सध्या सदर विभागाचे पितळ पावसाळ्यात उघडे पडते. ऐकामेकाच्या अंगावर चेंडू फेकण्याचे काम अधिकारी करत आहे तरी या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. ते अधिकार्‍यांनाही दिसत नाही.

शनिशिंगणापूर बायपास रस्त्यावर तर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. श्रीरामपुर एमआयडीसीतुन येणार्‍या वाहनांमुळे तर खड्डयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर साचते व खड्डेही पडतात.

सहा महिन्यापासून श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर एमआयडीसी पासून गणेशनगर या गावापर्यंत १३ किमी शिर्डी शिंगणापूर म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता अत्यंत खड्ड्यात गेला असुन गाडी चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे मौत का कुँवा म्हणून हा.नवीन नावारूपास आला आहे रस्ता कमी खड्डे जास्त अशीच परिस्थिती झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहे
आजपर्यंत या रस्ता दुरुस्ती साठी मुडंन आंदोलन खड्ड्यात झाडे लावून आंदोलन खड्ड्यात झोपून आंदोलन करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने आता आपल्या खाते कडे निधी नसल्याचे आमच्या लक्षात आलं आहे म्हणुन आम्ही आता दि.२९/०८/२०२० शनिवार रोजी.भिक मांगो आंदोलन करून रस्त्याच्या दुरुस्ती साठी जमा झालेला निधी आपणास पाठवत आहे तरी माझ्या आजपर्यंत चे आंदोलना मध्ये रिपब्लिकन पार्टी, भिमशक्ती, आम आदमी पाटीँ, आदींनी मोठा सहभागी झाले आहे आणि यापुढे देखील आमची मागणी पुर्णपणे मार्गी लावावा अशा मागणीचे पत्र काल सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी मा. सार्वजनिक मंत्री अशोकजी चव्हाण साहेब यांना पाठवले असून पुढील निर्णय येई पर्यंत
संबधित विभागांनी तातडीने डागडुजी करुन रस्ते किमान पावसाळा जाईपर्यत दुरुस्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here