कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार माजी सरपंच केशवराव होन यांच्या हस्ते करण्यात आला.
चांदेकसारे गावातील व पंचक्रोशीतल्या गुणवंत इ.१० वी12 वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी सरपंच केशवराव होन यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि कामात प्रामाणिकपणा असेल तर त्या क्षेत्रात यश हे भेटतच अशा प्रकारे आपण देशाच,राज्याचे, जिल्ह्याचे आणि चांदेकसारे पंचक्रोशीचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणार ही अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी चांदेेकसारेच्या सरपंच सौ पुनम खरात,उपसरपंच श्री विजय केशवराव होन,विठ्ठल होन सर,दिलीपराव होन,नारायण हरिभाऊ होन,अर्जुन होन, ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच चांदेकसारे गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here