श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजासाठी अहोरात्र झटणा-या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ मोहन शिंदे व डॉ सचिन प-हे यांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या श्रीरामपूरतील अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर यांचा सन्मान म्हणून त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

यांनी लॉकडाऊन काळात आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले तसेच अजूनही ते श्रीरामपुरातील लोकांना सेवा देण्याचे काम करत आहे त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचे योगदान तसेच सहभाग व सहकार्याबद्दल श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंच यांच्या तर्फे सन्मानचिन्ह व बुके देऊन सन्मान करण्यात आला

श्रीरामपुर शहरातील कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजातील सर्व समाजाच्या नागरिकांना आरोग्य सुविधा सह विविध प्रकारे मदत करणा-या डॉक्टर क्षेत्रातील मान्यवरांना श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूर मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूर व जागृत नागरिक मंचच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. के.के. आव्हाड मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. अनिल साळवे व जागृत नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. मनोजकुमार नवले व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here