श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील निपाणी वडगांव येथील अधिकृत ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे पळविल्याप्रकरणी मागील महिन्यापासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी  समक्ष  ग्रामस्थांशी संवाद साधून अशोकनगरची चौकी ही अशोकनगरलाच असल्याचा खुलासा केला आहे.


            या प्रकरणी निपाणी वडगांव चे सरपंच आशिष दौंड, विकास सोसायटीचे चेअरमन  संतोष राऊत, मल्हार सेनेचे अध्यक्ष संजय राऊत व भगतसिग भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी गावकऱ्यांच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर 4 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, निपाणी वडगांवची  अग्रक्रमांवर असलेली लोकसंख्या विचारात घेऊन अनेक वर्षांपासून अधिकृत मान्यता दिलेली ‘अशोकनगर पोलीस चौकी’ ही हरेगाव फाटा येथे हलविलेपासून अशोकनगर येथील अधिकृत पोलीस चौकी बंद आहे. अशोकनगर चौकीसाठी नेमणुका असणारे पोलिसही हरेगाव फाटा  येथेच थांबण्यास जास्त उत्सुक दिसत आहे.  त्यामुळे गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने गावात  अवैद्य व्यवसाय, गुन्हेगारी, महिला अन्याय, छेडछाड, अवैद्य व्यवसायाशी संबधित गुंडाचे वाढते प्रमाण आदि बाबीवर वचक ठेवणे जिकरीचे झालेले आहेत. त्याकरता ग्रामपंचायतीचे तक्रारींचे निवेदनही देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने गावच्या न्याय हक्कासाठी गावची अधिकृत सजेचे पोलीस चौकी ही पूर्ववत ठिकाणी अशोकनगर येथेच चालू ठेवण्यात येवून ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करणे व गावातील अवैद्य व्यवसाय व गुन्हेगारीवर चाप लावणे करीता सदर चौकीच्या नेमणूका असणाऱ्या पोलिसांना चौकी बंद न ठेवण्याचे आदेश द्यावेत व हरेगाव फाटा येथे ‘अशोकनगर फाटा पोलीस चौकी’ हे केलेले बेकायदेशीर नामकरण त्वरित हटवावे. या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.


            या प्रकरणी स्वतः शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व उपनिरीक्षक बहाकर यांनी अशोकनगर येथील पोलीस चौकीस समक्ष भेट देवून संवाद साधला, व अशोकनगरची पोलीस चौकी ही अशोकनगरलाच  असल्याचा खुलासा करून संबधित पोलिसांना अशोकनगर पोलीस चौकीत थांबण्याचा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी अशोक सह.साखर कारखान्याचे चे मा.अध्यक्ष सोपानराव राऊत यांच्या  प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस मा.सभापती सुनीताताई गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर राऊत, संजय गायधने,  रवींद्र पवार,संजय राऊत, दिपक राऊत, दिलीप राऊत, ज्ञानेश्वर खाडे, हमीद शेख, प्रशांतराजे शिंदे, ज्ञानेश्वर पडोळे, आप्पासाहेब दुशिंग, भारत वैरागर, दादासाहेब कापसे, बबन पाटोळे, आबा काळे, दादा राऊत  तसेच पो.कॉ. लोंढे, लोटके, किशोर जाधव, पोपट खराडे आदींसह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here