कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव  तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ.  शरदचंद्रजी  पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार सुभाष पर्वत गाडे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास दोन लाख रुपयांचा धनादेश नुकताच माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांचे वारस यांना देण्यात आला.
   
 कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळून आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा कुटुंबाची आर्थिक ओढाताण होवू नये व या कुटुंबाची आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार  पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार  नागरी  सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या कर्जदारांचे  ओरीएनटल  ईन्शुरन्स  कंपनीकडून प्रत्येकी दोन  लाख  रुपयांची  जनता व्यक्तिगत दुर्घटना  विमा  पॉलिसि  घेतली  आहे. 

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी  येथील रहिवासी असलेले संस्थेचे कर्जदार सुभाष पर्वत गाडे यांचे  अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर संस्थेने ओरीएनटल ईन्शुरन्स कंपनीकडे आवश्यक त्या सर्व कागद पत्रांची पूर्तता करून मयताच्या वारसाना दोन लाख रुपये रक्कम मिळवून दिली. या दोन लाख रुपये रक्कमेचा धनादेश मयताच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती शारदा सुभाष गाडे यांच्यावतीने त्यांचा मुलगा आशिष सुभाष गाडे  यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे चेअरमन राधु कोळपे, व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे, संचालक बाबुराव थोरात, गोरक्षनाथ दवंगे, गंगाधर चव्हाण, मॅनेजर बी.डी. काळे, सुभाष बढे,ओरिएंटल इन्शुरन्सचे विभागीय अधिकारी संतोष अग्रवाल, विमा प्रतिनिधी कैलास पांडे, बाबासाहेब गाडे आदी उपस्थित होते.
  
पतसंस्था मयताच्या वारसास दोन लाखाचा धनादेश माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देतांना आमदार आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here