रांजणखोल/प्रतिनिधी(भाऊसाहेब जाधव) :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे विशेषतः शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजापुरचे तुळजा भवानी मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर तसेच वाकडीचे खंडोबा मंदिर भाविकांसाठी व व्यवसाय करणाऱ्यासाठी खुली किंवा उघडी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खा.सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळा-प्रवरा विज संस्थेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या नेतृत्वाखाली रांजणखोल येथील श्री हनुमान मंदिरात राज्यभरातील सर्व ठिकाणचे मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यासाठी निद्रस्तपणे झोपलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात सरकारला जाग येण्यासाठी घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील श्री हनुमान मंदिराबाहेर घंटानाद करून दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा देऊन आघाडी सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी सरपंच चांगदेव ढोकचौळे,ऊपसरपं परविन शेख,प्रकाश शिरसाठ, अप्पासाहेब ङांगे,निवृत्ती दोंङ,रामकृष्ण दोंङ,कर्णा ढोकचौळे,भाऊसाहेब ढोकचौळे,अनिल ढोकचौळे, पोलीस पाटील कृष्णा अभंग,राजु गायकवाड,निलेश जाधव,सिद्धार्थ बागुल,लक्ष्मण कुलथे,शिवदास वाघ,गंगाधर ढोकचौळे,प्रविण ढोकचौळे, यांच्यासह रांजणखोल परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here