कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार

फलटण प्रतिनिधी- कोव्हिड- १९ या आजाराचा फैलाव दिवसें दिवस वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व त्यांचे कर्मचारी यांनी कोविंड रुग्णांना योग्य ते उपचार देणे कामे व त्यांना सोयी सुविधा पुरवण्या बाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांच्या हि पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. नामदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी केले.
फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे प्रतापसिंह ना.निंबाळकर सभागृहांमध्ये आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत श्रीमंत रामराजे बोलत होते.
यावेळी फलटण कोरेगावचे आ. दीपक चव्हाण, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार आर सी पाटील, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर धवण, डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. विक्रांत पोटे, डॉ. शितल सोनवलकर, तसेच फलटण तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स उपस्थित होते. विशेष करून या आढावा बैठकीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर हे ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाने कोरोना चाचणी घेण्याची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत वाढवण्यात यावी व जास्तीत जास्त चाचण्या घ्याव्यात त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाने तयार केलेले २५ बेडचे हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन चा पुरवठा करून त्यामधील ६ बेडला आय. सी. यू. सुविधा उपलब्ध करून द्यावी. व सोमवार पर्यंत ते हॉस्पिटल कार्यान्वित करावे तसेच दुर्दैवाने एखादा कोव्हिड झालेला रुग्ण दगावला गेल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्या रुग्णाचा मृतदेह नगरपरिषदेच्या ताब्यामध्ये द्यावा असे सांगून श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये तरडगाव, साखरवाडी, राजाळे, गिरवीसह तसेच अनेक ठिकाणी कार्यान्वित असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व त्यांच्या स्टाफने त्याठिकाणी कोरोना या टेस्ट घ्याव्यात व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तिथेच उपचार देण्यात यावेत त्यांच्या परिसरातील भागांचा आशा वर्कर्स मार्फत सर्वे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांची हेळसांड न करता काम प्रामाणिकपणे काम करावे गेली कित्येक वर्षे आपण या ठिकाणी काम करीत आहात आपणाला कोणत्याही स्वरूपाचा फलटणकरांनी त्रास दिलेला नाही. आज फलटण शहरातील व तालुक्यातील जनतेसाठी प्रामाणिक काम करण्याचे तुमचे दिवस आहेत. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे या काळामध्ये काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फलटण नगरपरिषदेने कार्यान्वित केलेल्या रुग्णालयामध्ये ही काही सोयी सुविधा पुरविणार असून तेथे लवकरच पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील व त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या मशिनरी त्याचबरोबर कोरोना रुग्णासाठी गरजेची असणारे औषधे ही पुरवली जातील असे सांगून श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटण शहरातील व फलटण तालुक्यातील खाजगी ओपीडी करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा आपल्या हॉस्पिटल मधील काही भाग कोरोना रुग्णांसाठी ठेवावा व शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांच्याकडून फी आकारून त्यांना सेवा देण्याचे काम करावे तसेच आपल्या हॉस्पिटलमधील कंपल्सरी काही बेड सुद्धा आयसोलेशन साठी ठेवणे गरजेचे असल्याचे शेवटी श्रीमंत रामराजे म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप म्हणाले की सप्‍टेंबर अखेर फलटण तालुक्यामध्ये चार हजार रुग्ण होतील त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले असल्याचे श्रीमंत रामराजे यांच्या निदर्शनास आणले.
या आढावा बैठकीसाठी फलटण शहरातील व फलटण तालुक्यातील काही डॉक्टर्स हे देखील उपस्थित होते.

*कधीही कोणावर सहजासहजी न चिडणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आज मात्र फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे इन्चार्ज डॉक्टर धवन यांच्यावर चिडलेले दिसले श्रीमंत रामराजे यांनी त्यांच्या कामावर नापसंती व्यक्त केली व भविष्यात आपली कामकाज सुधारण्याचे आदेश दिले*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here