श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जनतेची श्रध्दास्थानं असलेली मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी आज शनिशिंगणापूर परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते नितीन दिनकर आणि अनेक कार्यर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. 

महाराष्ट्रातल्या विविध प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

यावेळी “दार उघड उद्धवा, दार उघड मंदिराचे दार उघड…! दारूची दुकाने उघडी, बाजारपेठा उघड्या, बाजारात प्रचंड गर्दी” अशा घोषणा देण्यात आल्या.

राज्यभरातील सर्व ठिकाणचे मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडी यांच्यावतीने आज श्रीरामपूर येथे मान. जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मधु महाराज, स्वामी चैतन्यानंद महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, दादा महाराज रंजाळे, बनकर महाराज रामभाऊ महाराज मुठे, सुदाम महाराज मुठे, या संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव मुठे, तालुकाध्यक्ष सुनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली सर्वं मंदिराबाहेर या निद्रस्तपणे झोपलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात सरकारला जाग येण्यासाठी घंटानाद करून निषेध व्यक्त करण्यात आला त्या अनुषंगाने श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरांत श्रीरामपूरचें आराध्यदैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिराबाहेर व श्री हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन, साईबाबा मंदिर सुभाष कॉलिनी , हनुमान मंदिर कुंभार गल्ली, जय माता दि मंदिर पंजाबी कॉलनी, गुरुद्वारा दशमेश नगर, सुर्यमुखी हनुमान मंदिर काचेरीरोड व तर तालुक्यामध्ये सराला बेट, स्वामी सहजानंद भारती आश्रम नाऊर मतमाऊली मंदिर (चर्च)हरेगांव, नाऊर गांव, टाकळीभान, गणेशखिंड, खैरी निमगांव, गोंडेगांव, पेढगांव, बेलापूर, उंदिरगांव, निपाणी वडगांव, शिरसगांव, पढेगांव, मालुंजा, भेर्डापूर यांसह तालुक्यात ३३ तर शहरामध्ये ८ ठिकाणी असे एकुण ४१ मंदिराबाहेर घंटानाद करून “दार उघड उद्धवा दार उघड” अशा घोषणा देऊन आघाडी सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनामध्ये संदीप महाराज जाधव,शिवराज महाराज भनगडे,ह,भ,प,तांबे महाराज ,रामराज महाराज ,डॉ. शंकरराव मुठे,सोमनाथ दिघे, बळीराम मुठे, डॉ शशीकांत सांवत,बाळासाहेब मुठे, राजु मुठे, विष्णुपंत दिघे, बबनबाबा गोसावी, विठ्ठल पांचपिड, द्नेश्वर पवार,, किशोर लोखंडे, रामेश्वर मुठे, योगेश ओझा, प्रसाद बिलदिकर तेजस उंडे,गुरुद्वाराचे अनुपसिंग मस्किन , जसपालसिंग सहानी,शम्मीशेठ गुलाटी, दुर्गा माता मंदिराचे पुजारी परशुराम शर्मा , रवी रत्ति,भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर, गणेश राठी, मारुती बिंगले माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे , अनिल भनगडे , मुकुंद हापसे, प्रफुल्ल डावरे, संतोष हरगुडे रामभाऊ तरस, सुनिल दिवटे, विशाल यादव विशाल अंभोरे , अक्षय वर्पे, महेश खरात, मुकुंद लबडे, बापू वडितके, अविनाश काळे, संभाजी कवडे, अरुण शिंदे, शैलेश खाटेकर, प्रणव भारत, मच्छिंद्र हिंगमीरे , रुपेश हरकल, राजेश पाटील , पंकज करमासे, ज्ञानेश्वर कांबळे , गणेश हिंगमीरे प्रसाद तुसर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here