खड्डे बुजविण्याची मागणी करीता सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी शनिवारी भिक मांगो आंदोलन केले.
श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर हद्दीतील एमआयडीसी पासून गणेशनगर या गावापर्यंत १३ किमी शिर्डी शिंगणापूर म्हणून ओळखला जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भिक मांगो आंदोलन केले. अशोक लोंढे व इतर पक्षाच्या नेत्यांनी प्रशासनाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन करीत भिक मागण्यास सुरुवात केली. या वेळी रस्त्यावरील वाहनचालकांनीदेखील आंदोलकांना पैसे दिले.
एमआयडीसी पासून गणेशनगर या गावापर्यंत १३ किमी शिर्डी शिंगणापूर म्हणून ओळखला जाणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह वाहनचालकांना त्याचा त्रास होतोय. थोडा जरी पाऊस झाला की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून शनिवारी अशोक लोंढे व सर्व पक्षाच्या नेत्यांनी वतीने भिक मागो आंदोलन करीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या प्रशासनाला मदत करण्यात आवाहन करण्यात आले. रस्त्यावरील वाहनचालकांनी देखील यांना भिक मागण्यास सुरुवात केली.
या वेळी हे पैसे सामाजिक बांधकाम मंत्री अशोक जी चव्हाण यांना खड्डे बुजविण्यासाठी देण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी सांगत होते. त्यामुळे व्यावसायिकांनीदेखील भरघोस मदत केली. तर, रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनी सुद्धा खड्डे बुजविण्यासाठी पैसे दिले.
याच खड्ड्यात पडुन अनेक जन पडले आहे अनेक अपघात घडले आहे घडत आहेत तर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.तरीही कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या आगळा वेगळा भिक मांगो आंदोलनामध्ये अनेक सामाजिक, राजकीय संघटनेचे पदाधिकारीने आपला पाठिंबा दिला
हा रस्ता शिडीँ शिंगणापूर बायपास नसून मौत का कुँवा म्हणून नावारूपास येत आहे तरी सरकारने वेळेस दखल घ्यावी :- छावा प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ वाघ
महाराष्ट्र सरकार मध्ये या खात्याचे.मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल त्यासाठी सर्व तरी प्रयत्न करण्यात येईल :- जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे
सर्व सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्न साठी हे आंदोलन होत आहे आमचा जाहीर पाठिंबा आहे :- भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर
राज्य सरकार लोक प्रतिनीधी व आधिकारी हे गेडयाची कातडी सारखे निगरगट्ट झाले चे दिसून येत आहे यामुळेच सर्व सामान्य माणसाला अनेक समस्या ना सामोरं जावं लागतं आहे :- आम आदमी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष तिलक डुंगरवाल
रस्त्याच्या समस्या साठी आतापर्यंत शांततेच्या स्वरूपात अनेक आंदोलन झाली परंतु तरीही फरक पडत नसेल तर जन आंदोलने शिवाय पर्याय नाही :- लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ
या प्रसंगी अन्याय अत्याचार विरोधी आंदोलनाचे अध्यक्ष बाबासाहेब उबाळे, रिपब्लिकन पार्टी चे संजय बोरगे, योगेश बनसोडे, भाजपचे कैलास शिंदे, अण्णासाहेब थोरात, माजी सरपंच रवि (आण्णा) गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, कल्याण निळे, सचिन खांडरे, सुरेश शिवलकर, रामदास रेने, संजय शिरसाठ, आदी उपस्थित होते
‘भिक मांगो आंदोलनाद्वारे जमा झालेली मदत ही सामाजिक बांधकाम मंत्री यांना देण्यात येईल. त्यानंतर जर एमआयडीसी पासून गणेशनगर या गावापर्यंत १३ किमी शिर्डी शिंगणापूर म्हणून ओळखला जाणाऱ्या असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल. परंतु, आता येथील रस्त्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. असे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी सांगितले